विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये महिला प्रवाशावर बलात्कार : आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लंडन :
विमानाच्या सगळ्या महागड्या मानल्या जाणाऱ्या बिझनेस क्लास श्रेणीत एका महिला प्रवाशांवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही फ्लाईट अमेरिकेच्या न्यू जर्सी हुन लंडनला जात होती. 
न्यू जर्सी ते लंडन या फ्लाईटमध्ये पीडित महिला प्रवासी बिझनेस क्लास मधून प्रवास करत होती. न्यू जर्सी ते लंडन या प्रवासासाठी सात तास इतका वेळ लागतो. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. पिडिता आणि आरोपी हे दोघेही ब्रिटनचे रहिवासी आहेत. ते दोघही बिझनेस क्लासच्या वेगवेगळ्या रांगते बसले होते. त्यांची परस्परांशी ओळख नव्हती. घटनेपूर्वी विमानाच्या लाऊंज एरियात या दोघांनी एकत्र दारू प्यायली होती आणि काही वेळ संभाषणही केले होते. ही घटना घडली तेव्हा सर्व प्रवासी झोपले होते. असे पीडितेचे म्हणणे आहे. 
घटनेनंतर तिने याची कल्पना केबिन कुर्ला दिली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. विमान हिथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर पोलीस अधिकारी विमानात आले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. पीडितेला समुपदेशन केंद्रात पाठवले असून अधिकाऱ्यांनी फ्लाईटचे न्यायवैद्यकीय परीक्षणही केले आहे. वास्तविक विमानात असे प्रकार दुर्मीळ आहेत. पण गेल्या काही काळापासून अमेरिकेत विमानातील लैंगिक हिंसेचे प्रकार वाढत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.   Print


News - World | Posted : 2022-02-10
Related Photos