महत्वाच्या बातम्या

 हॉटेलच्या आड दारू विक्री : बेडगाव पोलिसांनी केली कारवाई, व्यावसायिकाला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेडगाव पोलीस मदत केंद्र हद्दीतील मोहगावजवळ सुरू असलेल्या एका हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती बेडगाव पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस अधिकारी अनिल नानेकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुरुपावर यांनी पथकासह शनिवारी दुपारी हॉटेलमध्ये धाड टाकली.

हॉटेलच्या किचनमध्ये एका स्कूल बॅगमध्ये २ हजार ४०० रुपयांची विदेशी दारू आढळून आली. शंकर पटले यांनी हॉटेल चालविण्यासाठी मागील एक महिन्यांपूर्वी सदर घर किरायाने घेतले होते. पटले हे या हॉटेलच्या आड अवैध विदेशी दारू विक्री करीत असल्याने पोलिसांनी घरमालकाला घटनास्थळी बोलावून शहानिशा केली. 

पोलिसांच्या तपासणीत घरी दारू आढळून आली. शंकर पटले आणि मिलिंद ताराचंद सहारे यांच्या विरोधात बेडगाव पोलीस मदत केंद्रात मदाका ६५ इ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोरचीचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनात बेडगावचे पोलीस अधिकारी अनिल नानेकर करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos