महत्वाच्या बातम्या

 १३ ऑक्टोबरला भारतीय मजदूर संघ गडचिरोली जिल्ह्याचे अधिवेशन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय मजदूर संघाचे दुसरे द्विवार्षिक अधिवेशन श्रीक्षेत्र हनुमान देवस्थान सेमाना चामोर्शी रोड, गडचिरोली येथे 13 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 11 वाजता सौ. शिल्पा देशपांडे अध्यक्ष भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

या अधिवेशनाचे उद्घाटन सौ नीता चौबे राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ दिल्ली यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून सी. व्ही. राजेश पश्चिम क्षेत्र प्रभारी तथा क्षेत्रीय संघटन मंत्री भारतीय मजदूर संघ मुंबई प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेशाचे महामंत्री गजानन गटलेवार, उपाध्यक्ष विवेक अल्लेवार, व्यंकटेश बाटवे ज्येष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र मोटर कामगार संघ तसेच भारतीय मजदूर संघ गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी हेमराज गेडे, सुरक्षा रक्षक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष जगजीवन दुधे, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश सचिव विकास अडबले चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळेस अधिवेशनात उपस्थित असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांची आरतीय मजदूर संघाचे कार्य वाढविण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन उपस्थित असलेल्या कामगारांना करण्यात आले. या अधिवेशनात शासकीय रुग्णालय, विद्युत उद्योग परीवाहन उद्योग, वायूनंदा पावर प्लांट, मनरेगा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, इमारत बांधकाम तसेच इतर उद्योगातील संघटित तथा असंघटित कामगार तसेच सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अधिवेशनात पुढील तीन वर्षाकरिता नवनिर्वाचित कार्य समिती गठित करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून विकास काबेवार तर जिल्हा सचिव म्हणून मनोज पड़ीशालवार यांची नियुक्ती करण्यात आली असे एकूण 19 पदाधिकाऱ्यांची कार्य समिती भारतीय मजदूर संघाचे विस्ताराकरिता गठित करण्यात आली अधिवेशन संपन्न करण्याकरिता सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी थोड्याच दिवसात चांगल्या प्रमाणात अधिवेशन यशस्वी केले असे भारतीय मजदूर संघाचे मूळ संघाचे गडचिरोली जिल्हासचिव मनोज पंडीशालवार यांनी एका पत्रकांवर कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos