महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना (२४  फेब्रुवारी)

२४  फेब्रुवारी १६७० : राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.

२४  फेब्रुवारी १८२२ : जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

२४  फेब्रुवारी १९१८ : इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

२४  फेब्रुवारी १९२० : नाझी पार्टीची स्थापना झाली.

२४  फेब्रुवारी १९३८ : ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

२४  फेब्रुवारी १९४२ : व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

२४  फेब्रुवारी १९५२ : कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

२४  फेब्रुवारी १९६१ : मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

२४  फेब्रुवारी १९८७ : इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

२४  फेब्रुवारी २००८ : फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

२४  फेब्रुवारी २०१० : एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

जन्म (२४  फेब्रुवारी)

२४  फेब्रुवारी १६७० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)

२४  फेब्रुवारी १९२४ : पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)

२४  फेब्रुवारी १९३८ : नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.

२४  फेब्रुवारी १९३९ : चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २०१२)

२४  फेब्रुवारी १९४२ : भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.

२४  फेब्रुवारी १९४८ : राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)

२४   फेब्रुवारी १९५५ : अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)

मृत्यू (२४  फेब्रुवारी)

२४  फेब्रुवारी १९७४ : कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.

२४  फेब्रुवारी १८१० : हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)

२४  फेब्रुवारी १८१५ : अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)

२४  फेब्रुवारी १९३६ : मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.

२४  फेब्रुवारी १९७५ : सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९५)

२४  फेब्रुवारी १९८५ : भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)

२४  फेब्रुवारी १९९८ : अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९१६)

२४  फेब्रुवारी २०११ : अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos