चोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / एटापल्ली :
येथील पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमन करून अवैध व्यवसाय केले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाने स्थानिक प्रशासनाकडून अतिक्रमन हटविण्याची कारवाई आज पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.  
 पंचायत समितीच्या मालकीच्या ३१ एक्कर भूखंडावर ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तथा कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय समुहनिवासी प्राथमिक शाळा तथा वस्तीगृह, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, आठवडी बाजार, पशु वैद्यकीय रुग्णालय व आरोग्य विभाग कर्मचारी वसाहत अशा शासकीय इमारती आहेत. 
 गेल्या काही महिन्यांपासून  शासकीय कार्यालय, रुग्णालय, कर्मचारी वसाहत, शाळा व महाविद्यालय परिसरातील भूखंडावर अतिक्रमनात वाढ होत असल्याने स्थानिक पंचायत समिती , जिल्हा परिषद पदाधिकारी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी विद्यार्थी संघटना, काँग्रेस व इतर सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे तक्रारी करून अतिक्रमने हटविण्याची  मागणी केली होती. तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी स्थानिक प्रशासनास अतिक्रमण हटविन्याचे  आदेश दिल आहे. 
 मुख्य मार्गावर रस्त्याच्या  दुतर्फा जागेवर छोटे मोठे चाळीस ते पन्नास दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे मुख्यमार्गावरुन वाहतूकीची कोंडी होऊन अपघातात वाढ झाली असून यातील बरेच अतिक्रमण धारक जुगार अड्डा चालवीने, दारू, गांजा व प्रतिबंधित सुगंधित तम्बाखू, गुटखा विक्री व्यवसाय करीत असल्याने  परिसरातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय , समुहनिवासी प्राथमिक शाळा, भगवंतराव पोष्ट बेसिक आश्रम शाळा, कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय, आदिवासी मुले व मुलींचे वस्तीगृह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनमानावर विपरीत परिणाम होत असल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे  त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटविन्याचे आदेश दिले होते. अखेर  आज अतिक्रमणे काढण्यात आली असून अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-25


Related Photos