महत्वाच्या बातम्या

 चांदापूर येथे शिवजयंती सोहळा व रक्तदान शिबीर संपन्न  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सावली : शिव गर्जना कला, क्रीडा व बहुउद्देशीय संस्था चांदापूर द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा २०२३ चांदापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

१९ फेब्रुवारीला सकाळी ११:०० वाजता तीन गटात वक्तृत्व स्पर्धा व त्यानंतर लगेचच वैयक्तिक नृत्य स्पर्धा घेण्यात आले. सायंकाळी ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत बाल गोपालापासून तर तरुण तरुणी सर्व महिला व पुरुष भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्यांनतर ठिक ७ : ३० वाजता प्रा. डॉ. विठ्ठलराव चौथाले यांचे व्याखान पर मार्गदर्शन झाले. त्यांनी शिवरायांच्या विचारानुसार जगले पाहीजे गावात एकोपा टिकवून गावाचा विकास केला पाहीजे, त्याचप्रमाणे इतर कोणत्याही धर्मापेक्षा मानवता धर्म हाच श्रेष्ठ आहे. असे मार्गदर्शन केले. 

दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला दोन गटात सामान्यज्ञान स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दिलीप पाल, नंदकिशोर शेरकी, प्रकाश पाल, सुरेश देशमुख, मनोज शेरकी, संतोष पोटे, योगेश तांदुळकर, लिलाधर बोदलकर मुल, नितीन चिंचोलकर, राहुल निशाने, गुरुदास श्रीगीरवार, राकेश मिडपलवार, अभिजित चिंचोलकर, दिपक आगरे, कमलेश चुदरी, किशोर तिवाडे, गंगाधर रामाजी पाटेवार, सुरज शेरकी, मोहित नागापूरे, रमेश पारेवार, उमेश कडूकार, जयेश पाल, रोशन पोरटे, दुर्वास कोहपरे, सचिन तिवाडे, निकेश पाल, पुनेश चिंचोलकार, बिलाल अंसारी, संजय संगीडवार, जानीवंत नन्नावरे, प्रफुल तिवाडे, उमेश नगरकर, सुधिर भंडारे, राकेश चौधरी, देवराव घोडमारे, गौरव कनाके, किशोर कडूकार, रविद्र आगरे, आशिष पाल, राहुल पाल, दिनकर झरकर, धनराज निशाने, अतुल पाल, राकेश केळझरकर, वामन नागापूरे, मनोज नन्नावरे (ग्रामसेवक), सोनीताई देशमुख (सरपंच), दिलीप पोटे, धिरज पाल, अंकुश शेरकी, पंकज निशाने, दिवाकर केळझरकर, पवन पाल आदी ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

यासाठी शिवगर्जना सांस्कृतिक, कला, क्रीडा व बहुउद्देशीय संस्था चांदापूरचे खुशाल पा. शेरकी, बंडू पोरटे, शेषराव पाल, विनोद कोहपरे,अजिंक्य शेरकी, जयदीश पोटे, मंथन चिंचोलकर, जैविक चिंचोलकर, सुमित शेरकी व सर्व सदस्यांनी सहकार्य केले. रक्तदान कार्यासाठी रक्त संक्रमण विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे पवार, जिद्देवार साहेब, पचारे साहेब, रुपेश घुमे व अभिलाष यांनी रक्त संक्रमण केले.

सायंकाळी ठिक ६:०० वाजता मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. दिलीप पाल यांनी २३ वेळा रक्तदान केल्यामुळे व चांदापूर च्या सरपंच सोनी कालिदास देशमुख यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले .

सर्व रक्तदात्यांच्या हस्ते प्रथम द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांना शिल्ड देऊन गौरविण्यात आले. व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमात नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos