पुलगाव दारूगोळा भांडार स्फोटातील मृतकांची संख्या सहा, जुने बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी  स्फोट झाला . या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या स्फोटामध्ये नारायण पचारे (वय ५५),  विलास पचारे (वय ४०),  प्रभाकर वानखेडे (वय ४०),  राजकुमार भोते (वय ३३),  प्रवीण गुंजेवार (वय २५) व  उदय वीरसिंह (वय ३८) हे मृत्युमुखी पडले आहेत. 
वर्धा येथील पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडार आहे. मंगळवारी सकाळी मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात ११ जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून  या घटनेचा तपास सुरु केला आहे.  मंगळवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात ११ जण जखमी झाले. तर सहा जणांचा स्फोटात मृत्यू झाला. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. निकामी बॉम्बचे जस्त कथिल अॅल्युमिनियम वेचण्यासाठी गावातील ग्रामस्थ फायरिंग रेंजमध्ये जातात, असे सांगितले जाते. यासाठी काही शेतमजूर तिथे गेले होते, असे समजते.
सैन्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या खमरिया येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील मुदतबाह्य बॉम्ब निकामी करण्यासाठी पुलगाव येथे आणली होती. आज सकाळी बॉम्ब नेत असताना स्फोट झाला. मृतांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दोन कर्मचाऱ्यांसह, दोन कामगाराचा समावेश आहे.   Print


News - Wardha | Posted : 2018-11-20


Related Photos