विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक झाले. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. 
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा, मुस्लीम, धनगर समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच दुष्काळाची केवळ कोरडी घोषणा न करता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मोबदला मिळावा, यासाठी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विरोधी पक्षांनी ठिय्या मांडला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-19


Related Photos