महत्वाच्या बातम्या

 वैद्यकीय तपासणी तथा औषध वितरण शिबिराचे उद्घाटन संपन्न


- राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : स्थानिक मूलचेरा नगरपंचायत नगरीतील मुलचेरा टोला येथे स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२३ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलचेरा टोला येथे आरोग्य तपासणी तथा औषध वितरण शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललित शनवारे राष्ट्रीय सेवा योजना सह समन्वयक अधिकारी, कार्यक्रमात उद्घाटक म्हणून गौरव बाला शिवसेना तालुका अध्यक्ष मुलचेरा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित मलिक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जावेद शेख तालुका आरोग्य अधिकारी मुलचेरा हे उपस्थित होते. 

शिबिरास सर्वतोपरी सहायता करण्याचे आश्वासन गौरव बाला तालुका अध्यक्ष मुलचेरा यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ते शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी संपूर्ण वैद्यकीय नेहमी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. ललित मलिक यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गौतम वाणी यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos