रेल्वे गाडीत महिलेची प्रसुती झाल्याने प्रवाशांची उडाली ताराबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
सिकंदराबाद -  बिकानेर एक्सप्रेस क्रमांक   १७०३७७ मध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची धावत्या गाडीतच  प्रसूती झाल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.  
सिकंदराबाद वरून राजस्थानच्या जोधपूरलगतच्या मोहराई येथे जाताना स्लीपर कोच पाचमध्ये महिलेची  प्रसूती झाली. तिने  मुलीला जन्म दिला.   ही माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली, गाडी वर्धा रेल्वे स्थानकावर पोहताच लागलीच तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.  बाळाचा जन्म ८ व्या महिन्यात झाल्याने वजन कमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महिलेचे नाव मायादेवी (२६)  असे    आहे.  सध्या बाळाचे वजन १.८८ किलोग्रॅम  असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. महिला ब बाळाची प्रकृती स्थिर आहे.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-15


Related Photos