विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी निरीक्षकांच्या भेटीचा कार्यक्रम जाहीर


- नागपूर येथे ७ सप्टेंबरला राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षकांची राजकीय पक्षांसोबत पहिली बैठक ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संबंधितांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १.१०.२०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षक जिल्हानिहाय एकूण तीन भेटी देणार आहेत.
या भेटीदरम्यान लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार, आमदार तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सर्व माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश सामान्य प्रशासनचे अपर आयुक्त यांनी दिले आहेत.




Petrol Price




