महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठाच्या बॅडमिंटन खेळाडू विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई करा


- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली यांची निवेदनाद्वारे मागणी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोनकुवर हे होते. मात्र, या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील चार्जर मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले. पूर्ण वेळ हे दोघे दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. सदर बाब ही अभाविपच्या लक्षात येताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गोंडवाना विद्यापीठाचे प्र कुलगुरू श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत निवेदनातुन कारवाईची मागणी केली आहे. 

घडलेला संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून गुन्हेगारांवर निलंबित कारवाई करण्यात यावी असे निवेदनाच्या मार्फत मागणी केली. 

त्वरित कारवाई न झालास तीव्र आंदोलन करू असे अभाविप विदर्भ प्रांत मंत्री शक्ती जी. केराम यांनी इशारा दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos