महत्वाच्या बातम्या

 ६ फेब्रुवारीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली व बार्टी, पुणे अंतर्गत स्पर्धा परीक्षा (lBPS, बँक, रेल्वे, एल.आय.सी, पोलीस ) भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली भारतीय सामाजिक बहुउद्देशिय विकास संस्था, गडचिरोली द्वारे संचालीत यांच्या संयुक्त विद्यमाने ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.चौक, एल.आय.सी.रोड गडचिरोली,येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. अनिल हिरेखन कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली देवसुदन धारगावे, प्रमुख मार्गदर्शक, प्रबंध संपादक, रोजगार नौकरी संदर्भ व नाथे पब्लीकेशन प्रा.लि.नागपूर, संजय नाथे, माजी सदस्य्म हाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई दयानंद मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली, माणिक चव्हाण, हे उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांना परीक्षेना समोर जाताना येणाऱ्या अडचणी तसेच मुलाखती संदर्भात असलेल्या समस्या संदर्भात  प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरच्या जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसुदन धारगावे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos