महत्वाच्या बातम्या

 सामाजिक कार्यकर्ता अजय लहानू दुर्गे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक समस्या, विद्यार्थि समस्या आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्याबददल अजय सुनीता लहानू दुर्गे यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्रचे संचालक श्रीकांत मद्दीवार यांचे हस्ते गौरविण्यात आले. भुजला नवेगाव ता. मुल येथील जन्म ठिकाण. पुढील शिक्षणासाठी चंद्रपूरला भाड्याच्या खोली मध्ये राहत असताना विद्यार्थांना कशी समस्या असते अशी जाणीव घेऊन त्या विद्यार्थ्यांना मदत करणे, गोर गरीब रुग्णांसाठी, गरजुसाठी मोफत रक्त पुरवठा, मोफत रुग्णवाहिका तसेच दवाखान्यात उपचार त्वरित मिळवून देणे, लोक वर्गणीतून रुग्णांस आर्थिक मदत करणे, असे अनेक कार्याची दखल घेऊन अजय दुगे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos