महत्वाच्या बातम्या

 शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दोन पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघाच्या तीन अशा एकूण पाच मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुरूवार २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.





  Print






News - Rajy




Related Photos