महत्वाच्या बातम्या

  जि. प .उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथील विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नागपुर व रामटेक येथे नेण्यात आली. सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातुन शाळेतील विद्यार्थ्यांना विवीध जीवनावश्यक अनुभव मिळण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नागपुर येथील रमण विज्ञान केंद्र, मेट्रो सफर, महाराज बाग, अजब बंगला, दिक्षा भुमी, रामटेक, रामधाम, जैन मंदिर, ड्रॅगन पॅलेस इत्यादी स्थळे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. रमण विज्ञान केंद्राच्या भेटीतुन तारा मंडळ, थ्री.डी.शो, सुर्यमाला इत्यादींचा प्रत्यक्ष अनूभव विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्रातुन घेतला. सहलीतील विवीध स्थळांच्या भेटीतुन पक्षी, प्राणी, पुरातत्व अवशेष, शिल्पकला, चिञकला, कोरीव काम, आदींचा अनुभव याठिकाणी घेतला. मेट्रोने प्रवास कण्याचा प्रत्यक्ष अनुभव व आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. सहलीच्या यशस्वीतेसाठी मुरखळा (माल) ग्रामपंचायतचे सरपंच भाष्कर बुरे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष धनराज बुरे, उपाध्यक्ष सौ. शारदा योगेश बोदलकर, शाळा व्यवस्थापन समीतीचे सन्माननिय सदस्य लोकेश सोमनकर, साईनाथ गेडेकर, सोमनाथ मेश्राम, शंकर वेलादी, सौ.सरिता लोशन रामटेके, सौ. शारदा वासुदेव राॅयकुंटवार, सौ.संगीता किर्तीदास सोमनकर, सौ.साधना रविंद्र सरपे, सौ.सरिता महेश बुरांडे, माजी अध्यक्ष विजय राजुरवार, माजी उपाध्यक्ष  निलकंठ सोमनकर, शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोईनवार, शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहा. शिक्षक  रमेश गेडाम, अशोक जुवारे, जगदिश कळाम, राजकुमार कुळसंगे, चंद्रकांत वेटे, कमलाकर कोंडावार आदिंनी विशेष सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos