'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू


- इतर मुलींना रुग्णालयातून सुटी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगमधील जवळपास दहा विद्यार्थिनिंची "हिपॅटायटीस बी' च्या लसीमुळं प्रकृती बिघडली यात हेमानी रविंद्र मलोडे वय १८ या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्यानं तिच्यावर सावंगी येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच तिचा आज पहाटे मृत्यू झाला . 
रुग्णालयात वावरताना संरक्षण म्हणून हिपॅटायटीस बी ही लस दिली जाते. राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाला असलेल्या बीएससी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. त्यांनंतर जवळपास १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यान एकच धावपळ उडाली.
विद्यार्थिनीला अँनाफायलाटिक्स रिअँक्शन आल्यान तिची प्रकृती गंभीर आहे. अस क्वचितच होते. ही बाब दुर्दैवी आहे. याबाबत नोडल सेंटरला कळविले असून त्याचे रिपोर्ट पाठविले आहे, अस डॉक्टरांनी सांगितले.
या संदर्भात मयत मुलीच्या वडीलाना विचारणा केली असता मला या विषयी काहीही तक्रार नाही असे सांगण्यात आले, रूग्णालय प्रशासनाचा दबाव असल्याचा परिसरात बोलल्या जात आहे. या प्रकरणी सावंगी पोलिस स्टेशनला मुत्युची नोंद करण्यात आली आहे.
   Print


News - Wardha | Posted : 2018-11-04


Related Photos