ड्रग्जविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई : नवी दिल्लीत पकडले २ हजार ५०० कोटींचा ड्रग्ज, ४ जणांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
दिल्लीला पडणारा अंमली पदार्थांचा विळखा वाढत चालला असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंतचे सर्वाधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ३०० किलोपेक्षाही अधिक ड्रग्ज जप्त केले असून त्याची बाजारातील किंमत ही २ हजार ५०० कोटींपेक्षाही अधिक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून दिल्लीत झालेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या ड्रग्ज रॅकेट उघडकीला आणण्याच्या प्रक्रियेची इत्यंभूत माहिती दिली. भारतात वेगवेगळ्या देशांतून समुद्रमार्गे ड्रग्जची तस्करी होत असून त्यातील बहुतांश ड्रग्ज हे दिल्लीत येत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ३५४ किलो अंमली पदार्थ जप्त केले. बाजारातील सर्वात महाग मिळणारे हे हेरॉईन असून ते अफगाणिस्तानवरून आणले गेल्याचेही उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन पंजाबचे असून एक काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ड्रग्ज मध्यप्रदेशातील शिवपुरी या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी नेले जाणार होते, अशी माहिती आहे. त्यानंतर ते पंजाबमध्ये नेऊन त्याची विक्री करण्याचा डाव होता. मात्र पोलिसांनी हा डाव हाणून पाडला आहे.
  Print


News - World | Posted : 2021-07-10


Related Photos