महत्वाच्या बातम्या

 ताडपत्री न लावताच रेती व विटाची खुलेआम वाहतूक


- सिंदेवाही शहरासह ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन..संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : रेती,  विटांसह गौण खनिज वाहतूक करताना ताडपत्रीचे कव्हर लावणे बंधनकारक असतानाही, सिंदेवाही शहरासह ग्रामीण भागात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

रेती,  विटांची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात धूळ निघते, कण खाली पडतात. हे कण किंवा धूळ हवेत येत असल्याने इतर वाहन चालकांच्या डोळ्यात जाऊन अपघाताची शक्यता  नाकारता येत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी १ जानेवारी २०२४ पासून गौण खनिज वाहतूक करताना वाहनाला ताडपत्रीने पूर्णतः झाकले नसेल, तर ५० हजार रुपयांपर्यंत दंड व परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली. 

या नियमाची अंमलबजावणी सिंदेवाही तालुक्यात होताना दिसत नाही, याची पडताळणी केली असता, बुधवारी खुलेआम वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले.  भरधाव जाणाऱ्या एका वाहनातून विटा व रेतीची वाहतूक करताना ताडपत्री किंवा अन्य कोणतेही सुरक्षात्मक उपाय केले नसल्याचे दिसून आले. नियमानुसार ५० हजारांचा दंड व परवाना रद्द होतो. असा नियम असताना कारवाई होतच नसल्याने यामागे कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos