महत्वाच्या बातम्या

 रासेयो सवयंसेवकानी केली मतदान जागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आष्टी : वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलगनित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने चपराळा या दुर्गम गावात आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत मतदान जागृती जनजागृती रॅलीचे डॉ.राजकुमार मुसने यांच्या नेतृत्त्वात अयोजन करण्यात आले. रॅलीत उपसरपंच दयानाथ कोकेरवार मोरेश्वर गुरनुले. कीर्तिमंत शेडमाके. प्रवीण कांबळे, शोभा टेकाम, अर्चना गुरनुले, रेखा संतोष कोकेरवार, सौ. पार्वती कोकेरवार उपस्थित होते. गावातील विविध गल्लीतून मतदार नोंदणी करण्याचें आवाहन करण्यात आले. अद्यावतच लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी मतदार जनजागृती या विषयांवर प्रा. डॉ. गणेश खुणे यांनी मार्गदर्शन केले.  बौद्धिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले होते. यावेळी डॉ. राजकुमार मुसने, प्रा. ज्योती बोबाटे ग्रामस्थ व सवयंसेवक उपस्थित होते. प्रा. मुसने यांनी मतदान किती मूल्यवान असून मतदान हा आपला हक्क आहे, याचे भान ठेवत नव मतदारांनी नोदणी करण्याचे आवाहन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos