भामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय भामरागड च्या वतीने काल ३१ आॅक्टोबर रोजी वनविभागाच्या सभागृहात भव्य जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन सिआरपीएफचे ३८ व्या बटालियनचे कमांडंट मिना यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अजय बन्सल, तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी सोनवणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला संस्कार प्रतिष्ठाण पिंपरी चिंचवड चे संस्थापक डाॅ. मोहन गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. दुर्गे, भामरागड नगर पंचायतीच्या नगरसेविका घाडगे, बासंती मडावी, भारती ईष्टाम, सब्बर बेग मोगल, पोलिस निरीक्षक सुरेश मदने, पत्रकार तसेच नागरिक उपस्थित होते.
जनजागरण मेळाव्यात संस्कार प्रतिष्ठाणचे संस्थापक डाॅ. मोहन गायकवाड व त्यांच्या चमुने भामरागड परिसरातील ६ हजार नागरिकांना कपड्यांचे वाटप केले. यामध्ये साड्या, पुरूषांचे कपडे, लहान मुलांचे कपडे तसेच ५१ गर्भवती महिलांना प्रोटीन आहाराचे वाटप करण्यात आले. लहान मुलांना खाउ वाटप व दिवाळीच्या फराळाचे तसेच साखरेचे वाटप करण्यात आले. मैत्री संघटना नागपूरचे सुरेश खरे, आशिष नागपूरे, मनोज गावडे यांनी औषधे वाटप केली. ग्रामीण रूग्णालय भामरागड येथील डाॅ. दुर्गे आणि त्यांच्या चमुने आरोग्य तपासणी केली. कलापथकाच्या माध्यमातून नक्षलविरोधी जनजागृती करण्यात आली. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत सविस्तर माहिती दिली. आत्मसमर्पण योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी केले. कार्यक्रमास भामरागड तालुक्यातील ३ हजार नागरिकांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड, सुसतकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, भामरागड पोलिस ठाणे, क्युआरटी भामरागड येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-01


Related Photos