महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांसाठी १३६ इन्फंट्री बटालीयन इको महार मध्ये पदभरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :  १३६ इन्फंट्री बटालीयन इको महार मार्फत भुतपुर्व सैनिकांसाठी ०४ जेसीओ १६२ सोल्जर जीडी पदासाठी भरती प्रक्रिया राबाविण्यात येत आहे. १०९  इन्फ्रंट्री बटालीयन कोल्हापुर येथे १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत व एआरओ ग्राउंड छत्रपती संभाजीनगर येथे ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ५ वाजता पासुन भरती प्रक्रिया चालु होणार आहे. या भरती प्रकियेचा माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

भरती प्रक्रियेसाठी इच्छुक माजी सैनिकांनी डिस्चार्ज बुक, पीपीओ, आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, १० पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos