भद्रावतीत जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलिसांची धाड : नऊ जुगारी ताब्यात, सुमारे ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील डोलारा तलाव परिसरातील पंचशील नगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री धाड टाकून नऊ जुगारूंना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, सात मोटारसायकली, सहा मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ९८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना पंचशील नगर परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत बुधवारी मध्यरात्री संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांचा छापा पडताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नऊ जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत धिरज शंकर शेट्टी ३२ वर्षे झिंगूजी वॉर्ड, ऋषिकेश भांकर मडावी २५ वर्षे पंचशील वॉर्ड मुकेश वासुदेव सोना ३५ वर्षे डोलारा तलाव, अजित शंकर शेट्टी २८ वर्षे किल्ला वॉर्ड, मन्नू वासुदेव सोना ३८ वर्षे डोलारा तलाव), अमित ओमप्रकाश टेभुर्णे २६ वर्षे पंचशील नगर, उमेश भामराव रणदिवे ३५ वर्षे डोलारा तलाव, राकेश नामदेव कुळमेथे ३५ वर्षे पंचशील नगर आणि सोनू ज्ञानेश्वर ढेंगळे ३६ वर्ष किल्ला वॉर्ड यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, सात मोटारसायकली, सहा मोबाईल फोन आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५ लाख ९८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर तसेच संतोष केदार, महेंद्र बेसरकर, आस्टूनकर, डुकरे, आतकुलवार आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.
News - Chandrapur




Petrol Price




