महत्वाच्या बातम्या

 राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहर व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या नव्या बसगाड्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. नव्या बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा रविवार, ९ ऑगस्ट रोजी बल्लारपूर बसस्थानक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून व पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नव्या बसगाड्यांमुळे बल्लारपूर तसेच परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुविधाजनक सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार आहे.

नवीन बससेवेमुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बसगाड्यांचे लोकार्पण महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या नावाने बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे ही बल्लारपूरसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक सुविधांच्या विकासाची प्रक्रिया यापुढेही सुरू राहील, असेही सांगण्यात आले.लोकार्पण सोहळ्यास एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नव्या बससेवेचे उपस्थितांनी स्वागत केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos