वीजचोरी उघड : २,२६१ युनिटचा अनधिकृत वापर, गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महावितरणच्या भरारी पथकाने पवनी तालुक्यातील कोंढा येथे केलेल्या तपासणीत वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी संबंधित ग्राहकाविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरारी पथकाने कोंढा येथील श्रीकृष्ण मेश्राम यांच्या घराची तपासणी केली असता, त्यांनी तब्बल २,२६१ युनिट विजेचा अनधिकृत वापर केल्याचे निदर्शनास आले. या वीजचोरीमुळे झालेल्या महसुली नुकसानीपोटी त्यांच्याकडून ४७ हजार ७१७ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.
मात्र, वीजचोरी प्रकरणातील नियमानुसार आकारण्यात आलेली तडजोडीची रक्कम संबंधितांनी न भरल्याने महावितरणने त्यांच्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




