महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम : गांजा सेवन करणाऱ्या ९ जणांवर गुन्हे, १२९ ग्रॅम गांजा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने कारवाई केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत १२९ ग्रॅम गांजासह १२ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करताना आढळून आलेल्या साहिल सुरेश दिवसे २३ वर्षे रा. सुभाषनगर, पुलगाव, मानव रवींद्र रंगारी २७ वर्षे रा. नागपूरफैल, पुलगाव, शेख इरफान शेख मोहम्मद ४२ वर्षे रा. तेलघानी मिल, पुलगाव, नमेशकांत श्रीकांत पाटील ३४ वर्षे रा. रामटेके ले-आऊट, पुलगाव, राजू गुणवंत दुरगुडे २७ वर्षे रा. तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट, ऋषभ पुरुषोत्तम मडावी २४ वर्षे  रा. चिंचोली, हिंगणघाट, जय अजय वाघ २० वर्षे  रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट, सक्षम नितीन नांदुरकर १९ वर्षे रा. सोमनाथे ले-आऊट आणि मेघराज रामगरीब रजत ५१ वर्षे रा. गिरीपेठ, वर्धा यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अमली पदार्थांचे सेवन व संशयास्पद हालचाली वाढत असल्याची नागरिकांकडून तक्रार होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आदिवासी कॉलनीत कारवाई; १२९ ग्रॅम गांजा जप्त -
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा यांच्या विशेष पथकाने आदिवासी कॉलनी परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत १२९ ग्रॅम गांजा व एकूण १२ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मंगेश उर्फ जॉन शंकरराव कोकाटे ३९ वर्षे रा. आदिवासी कॉलनी व यश बेमल सध्या फरार यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





  Print






News - Wardha




Related Photos