बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रेल्वे चाइल्ड हेल्प ग्रुपची मासिक आढावा बैठक संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील व्ही.आय.पी. हॉल येथे मंगळवारी रेल्वे चाइल्ड हेल्प ग्रुपची मासिक आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत रेल्वे परिसरातील बालसुरक्षा, हरवलेल्या व सापडलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, विविध विभागांतील समन्वय तसेच बालकांच्या पुनर्वसनासंदर्भातील कार्याचा आढावा घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्टेशन प्रबंधक दशरथ सिंह होते. यावेळी क्षेत्रीय अधिकारी डी. डी. भालाधरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पीएसआय रवेंद्र सिंह, कमर्शियल ऑफिसर यशवंत चंदेलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जीआरपीचे अखिलेश चौधरी, टीसी रजनीश कुमार, जिल्हा चाइल्डलाइन समन्वयक अभिषेक मोहुर्ले, रेल्वे चाइल्डलाइन सुपरवायझर भास्कर ठाकूर, त्रिवेणी हाडके, बबिता लोहकरे तसेच केस वर्कर सुरेंद्र धोडरे, धर्मेंद्र मेश्राम आणि विजय अमर्थराज मिल्क्यू उपस्थित होते.
बैठकीत रेल्वे स्थानक परिसरात बालकांच्या सुरक्षेसाठी विविध विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. तसेच गरजू, हरवलेली अथवा संकटग्रस्त बालके आढळल्यास त्यांना तातडीने संरक्षण देऊन संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी बालहक्क संरक्षण, जनजागृती आणि रेल्वे परिसरात बालसुरक्षेच्या दृष्टीने संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठक सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.
News - Chandrapur




Petrol Price




