आषाढ वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी वारकरी व भाविकांना दिलासा : आरटीओकडून विशेष पास व स्टिकरची सुविधा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढ वारी यात्रेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या तसेच वारीनंतर परतणाऱ्या पात्र वाहनांना टोल करातून पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे.
यंदाची आषाढ वारी यात्रा १३ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या प्रवासाचा खर्च कमी व्हावा आणि त्यांना अधिक सोयीचा प्रवास करता यावा, यासाठी शासनाने ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत टोलमाफी लागू केली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार मानाच्या पालख्या, वारकरी तसेच आषाढ वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या पात्र वाहनांना ही सवलत लागू राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या अखत्यारितील सर्व पथकर नाक्यांवर ही टोलमाफी मिळणार आहे.
टोल सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनांची आवश्यक कागदपत्रे तपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) विशेष टोल सवलत पास आणि स्टिकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संबंधित वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधून आपला पास प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.आषाढ वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी व भाविकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या सोयीचा होण्यास मदत होणार
News - Chandrapur




Petrol Price




