महत्वाच्या बातम्या

 उमरेड रोडवर दुचाकी घसरून वृद्धाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड रोडवरील इंडियन गॅस गोदामासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृताचे नाव सुखराम नत्थू मानकर ८३ वर्ष असे आहे. रविवारी उमरेड रोडवरील इंडियन गॅस गोदामासमोर दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताचे नातू प्रकाश अशोक मेश्राम यांनी दिलेल्या माहितीवरून सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू असून अधिक चौकशी करण्यात येत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos