महत्वाच्या बातम्या

 वृद्ध पित्याच्या हत्येप्रकरणी मुलगा व सुनेला तेलंगणातून अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : संपत्तीच्या वादातून वृद्ध पित्याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या मुलगा व सुनेला बल्लारपूर पोलिसांनी तेलंगणातील वारंगल येथून अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी राजू काटीक व त्याची पत्नी रवलिका राजू काटीक हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते.

तांत्रिक माहिती व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत तेलंगणातील वारंगल येथे छापा टाकला. या कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन बल्लारपूर येथे आणण्यात आले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, संतोष पंडीत, विकास जुमनाके, पुरुषोत्तम चिकाटे, लालू यादव, पोलीस अंमलदार सचिन अल्लेवार, लखन चव्हाण, खंडेराव माने, शरदचंद्र कारूष, महेश कुकुडकर आणि वैभव गाडगे यांनी पार पाडली.या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos