महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा १२ जुलै रोजी : जेईई-नीट परीक्षेच्या पूर्वतयारी मार्गदर्शनासाठी विशेष उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जेईई-नीट परीक्षेच्या पुर्वतयारी मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी द्वितीय चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १२ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी  वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता १० वी उत्तीर्ण व बारावीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनस्तरावर मान्यताप्राप्त संस्थेमार्फत मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या परिक्षेसाठी वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चिमुर, भंडारा आणि देवरी या सहा प्रकल्पांमधील जेईईसाठी १०५ तर नीट परीक्षेसाठी ९८ असे एकूण २०३ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.





  Print






News - Wardha




Related Photos