सिरोंचा–आलापल्ली मार्गावर ३१ ऑक्टोबरपर्यंत जडवाहतुकीस प्रतिबंध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. मात्र, आपत्कालीन सेवा, प्रवासी बस, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
जड वाहनांनी सिरोंचा-मंचेरियाल-राजुरा-बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली तसेच आलापल्ली-आष्टी-बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




