महत्वाच्या बातम्या

 लॉयड्स राज विद्या निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : लॉयड्स राज विद्या निकेतन लॉयड्स राज विद्या निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि सांस्कृतिक जागरूकतेचा संदेश विद्यार्थी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अर्चना जोशी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी निरोगी जीवनशैली, शिस्तबद्धता आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यानंतर संगीत विभागातील राहुल अमोरकर, नुपूर रॉय आणि कु. मेघा देंघरे यांनी राग भूपालीचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

योग शिक्षक अभिषेक कोपुलवार आणि नूतन मुतकुरे यांनी विविध योगासने सादर करत त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती दिली.

प्रकल्प संचालिका सुनीता मेहता यांनी आपल्या मार्गदर्शनात दैनंदिन जीवनात योग आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे महत्त्व विशद केले.

एलआयएफच्या संचालिका  कीर्ती रेड्डी यांनी आपल्या संदेशात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे सांगत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, तसेच व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेसह मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दूरदृष्टीला पुढे नेण्याचे आवाहन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी  नितीन चौधरी यांनी आपल्या संदेशात निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते असे सांगत सर्व कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य राखण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा समारोप दलसू जोई यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी कला विभागातील अमोल तिघरे, मोनाली पांडीलवार आणि सुयश महाताव यांच्या कार्यक्रमासाठी दिलेल्या सर्जनशील योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सर्वांगीण विकासाच्या मूल्यांना अधिक बळकटी मिळाली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos