महत्वाच्या बातम्या

 १९ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च द्या अन्यथा होणार अपात्रतेची कारवाई


- संबंधित तहसील कार्यालयात खर्चाचा हिशेब जमा करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निर्वाचित झालेल्या व बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांनी निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब १९ जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या सरपंच व उमेदवार यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुका वगळता एकूण १४ तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ५८ जागांकरीता व सदस्य पदासाठी ४९३ जागांकरिता निवडणूक घेण्यात आली होती. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली. या निवडणुकीमध्ये सरपंच पदाकरीता तीन जागा व सदस्य पदाकरीता ५८ जागा बिनविरोध झाले आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos