महत्वाच्या बातम्या

 निर्भय ट्रान्सपोर्ट कार्यालयात मन की बातचे श्रवण : कर्मचारी व भाजप पदाधिकारी उपस्थित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी येथील निर्भय ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी निर्भय ट्रान्सपोर्टचे कर्मचारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशाच्या प्रगतीसाठी जनसहभागाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी, नवकल्पना, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना राष्ट्रहितासाठी अधिक सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी आमदार चैनसुख संचेती, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हा संयोजक सतविंदर सिंग दारी, केरळ प्रकोष्ठाचे के. ओ. बेन्नी, तेजिंदर सिंग दारी, गुलशन शर्मा, मंजीत सिंग कालरा, आशिष चावडा, भाटियाजी, राजा अरोरा, शुभम रहीकवार, सोनू दारी यांच्यासह निर्भय ट्रान्सपोर्टचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध विषयांवर चर्चा केली. मन की बात मधून समाजहित, राष्ट्रनिर्माण आणि लोकसहभागाला चालना देणारे संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. बामणी परिसरात आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





  Print






News - Chandrapur




Related Photos