महत्वाच्या बातम्या

 नमाद महाविद्यालयात स्वयंरोजगार माहिती आणि मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील तक्रार निवारण समितीच्या वतीने भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत बीओआय स्टार गोंदिया आरसेटी द्वारे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी मोफत प्रशिक्षण अंतर्गंत कमवा आणि शिकवा या विषयाला घेऊन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात स्वयंरोजगार माहिती आणि मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ. बबन मेश्राम, मार्गदर्शक म्हणून मुख्य प्रशिक्षक सतीश झाडे, महिला प्रशिक्षक अश्विनी टेंभुर्णीकर उपस्थित होते. शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सतीश झाडे यांनी सध्याची परिस्थिती आणि आपल्या पुढील रोजगाराच्या समस्या यावर विस्तृत मार्गदर्शन करून इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वयंरोजगार सुरु करून यशस्वी उद्योजक बनण्याचे आवाहन केले. अश्विनी टेंभुर्णीकर यांनी केंद्रात सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. खंडेलवाल यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योजक बनून इतरांना नोकरी देण्याचे स्वप्न बघून ते सत्यात उतरवावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. बबन मेश्राम यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचा विध्यार्थ्यांना ध्यास घ्यावा, असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रिया बैस, प्रास्ताविक डॉ. अश्विनी दलाल तर आभार डॉ. सरिता उदापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तक्रार निवारण समितीचे सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विध्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos