महत्वाच्या बातम्या

 दहशतवादी हल्ल्यास बिमोड करण्यासाठी रंगीत तालीम चंद्रपूर येथील प्रसिद्ध माता महाकाली मंदीरात प्रात्यक्षिक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपुर : भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास व ओलीस नागरीकांची सुटका कशी करावी. याबाबतचे प्रात्यक्षिक चंद्रपुर येथील जाराध्य दैवत माता महाकाली मंदीर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधिक्षक रविंद्र सिंग परदेशी त्यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
११ जानेवारी २०२३ च्या सकाळी १०:३० वाजता चंद्रपुर येथील महाकाली मंदीर परीसरात तिन दहशतवादी अचानकपणे प्रवेश करून दर्शनासाठी आलेल्या भावीकांना शस्त्राचा धाक दाखवून ओलीस ठेवले आहे. अशी माहिती मंदीर परीसरातून १०.३५ वाजताच्या दरम्याण पोलीस कंट्रोलरूम येथे मिळाल्यावर पोलीस उप अधिक्षक (गृह) शेखर देशमुख यांनी कंट्रोलरूम येथून वरिष्ठांशी योग्य समन्वय साधुन सर्व पथके तात्काळ सर्व पदक ज्या मध्ये दहशतवाद विरोधी शाखा, सि-६० कमांडो पथक, आरसिपी पथक, विडीडीएस पथक, श्वान पथक, नक्षल सेल, सुरक्षा शाखा, पो.स्टे. चंद्रपुर शहर पोलीस पथक, पोलीस वैद्यकीय चमु वाहनासह घटनास्थळी हजर झाले. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर सुधिर नंदनवार हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांनी घटनास्थळाची सुत्रे हातात घेतले व मंदीर परिसरात दहशतवाद्यांना ताब्यात घेणे व ओलीस असलेल्या नागरीकाची सुखरूप सुटका करण्याची कारवाई प्रात्यक्ष पुर्ण करण्यात आले.
प्रात्यक्षिक वेळी मंदीर परिसरात नागरीकामध्ये भितीचे वातावण निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेवून पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते.
प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पोलीस निरीक्षक पो.स्टे. चंदपुर शहर आंभोरे, पो.नि. जिवाशा शिंदे, सपोनि पारडकर सि-६०/ आर.सि.पी. सपोनि राखोंडे सुरक्षा शाखा, पोउपनि सरकार देवि शाखा/नक्षल सेल, पोउपनि विश्वास वि.डि.डि.एस., पोउपनि पाटील श्वान पथक तसेच पोलीस वैद्यकीय अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos