महत्वाच्या बातम्या

 जिल्हा पोलिस दलात ३०  अत्याधुनिक वाहने


- पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून पोलिस दलाचे आधुनिकीकरण

- चारचाकी वाहनांसाठी नियोजनमधून २ कोटी  ७५ लक्ष मंजूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलिस दल आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे. गेल्याकाही दिवसात विविध प्रकारच्या सुविधा विभागास उपलब्ध करून देण्यात आल्या असून नव्याने १५ अत्याधुनिक वाहनांसाठी २ कोटी ७५ लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे. लवकरच ही वाहने पोलिस दलात दाखल होणार आहे. 

पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील विभाग आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसह समाजात सामाजिक एकोपा, बंधुभाव रहावा तसेच महिला, बालकांचे संरक्षण, विविध घटकांत शांतता रहावी यासाठी विभाग सातत्याने काम करत असतो. गेल्या काही दिवसात मात्र पोलिसांचा ताण वाढला आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे या विभागावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊन पडल्या. त्यामुळे विभागाचा ताण कमी करण्यासोबतच अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी आधुनिक संसाधने उपलब्ध करून देण्यावर पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा भर आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडे अत्याधुनिक वाहने उपलब्ध असणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्हा पोलिस दलास ३० वाहने उपलब्ध होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यात टीव्हीएस रायडर दोन, ईरटीगा इंटरसेप्टर, मोबाईल सर्विलन्स व्हॅन सहा, २५ शिटर आयशर बस दोन, फॅारेन्सिक मोबाईल व्हॅन चार या वाहनांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात जिल्हा पोलिस दलासाठी १५ अत्याधुनिक चारचाकी वाहने मंजूर करण्यात आली आहे. या १५  वाहनांच्या खरेदीसाठी २ कोटी  ७५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहनांची सद्या खरेदी प्रक्रिया सुरु असून येत्या काही दिवसात ही वाहने देखील जिल्हा पोलिस दलास उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीची नजर -

गुन्हेगारीवर आळा घालण्यासोबतच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अतिशय उपयुक्त ठरतात. अनेक प्रकरणात गुन्ह्यांचा उलगडा किंवा गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होते. त्यामुळे जिल्ह्यातील शहरांवर या कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून दिला. गेल्यावर्षी वर्धा, हिंगणघाट व देवळी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यासाठी १० कोटी ६५ लक्ष खर्च करण्यात आले. यावर्षी पुलगाव व आर्वी शहरात सीसीटीव्ही सर्वेलन्स प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मंजूर केला आहे.

जिल्हा पोलिस दल आधुनिक करण्याचा प्रयत्न - डॉ. पंकज भोयर -

पोलिस विभाग अतिशय संवेदनशील आहे. योगायोगाने हा विभाग माझ्याकडेच आहे. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासोबतच सामाजिक शांतता राखण्याचे काम या विभागास करावे लागते. त्यामुळे जिल्हा पोलिस दलास अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देऊन हा विभाग आधुनिक करण्यावर माझा भर आहे. त्यामुळे अत्याधुनिक वाहने, सीसीटीव्ही कॅमेरे, नवीन इमारती सोबतच पोलिसांना एक चांगले वातावरण मिळेल, असा प्रयत्न आपण करत असल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos