पत्ता विचारून लुटणाऱ्या चोरट्याला चंद्रपूर शहर पोलिसांनी हिंगणघाटातून केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पत्ता विचारण्याचा बहाणा करून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या खिशातून ५५ हजारांची रक्कम हिसकावून फरार झालेल्या अभिषेक उर्फ गट्टू किरण नकवे २५ वर्ष, रा. दादमहल वॉर्ड, चंद्रपूर याला चंद्रपूर शहर पोलिसांनी हिंगणघाट येथून अटक केली. आरोपीकडून ५१ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाने त्याला पुढील कारवाईसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी लंकेश मधुकर पाटील ५० वर्ष रा. होकम चौक, दादमहल वॉर्ड, चंद्रपूर यांनी २९ जुलै रोजी आईच्या उपचारासाठी ४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दादमहल वॉर्ड येथील सराफा दुकानात विकून ५५ हजार रुपये मिळविले होते. ही रक्कम प्लास्टिकमध्ये गुंडाळून खिशात ठेवून ते पायी घरी जात असताना दादमहल वॉर्ड परिसरात आरोपी त्यांच्या जवळ आला. त्याने पत्ता विचारण्याचा बहाणा करत फिर्यादीचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या खिशातील पैशांचे प्लास्टिक हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ८२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती व मुखबिरांच्या मदतीने आरोपीची ओळख पटविली. आरोपी हिंगणघाट येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून ५१ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांचा डिबी पथक प्रमुख पोउपनि दत्तात्रय कोलते, पो. हवा. संजय धोटे, रूपेश रणदिवे, संतोष कनकम, जावेद सिद्दीकी, संतोष दंडेवार, नापोअं कपरचंद खरवार, पोअं सुशांत घिवे, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, मपोअं. दिपिका झिंगरे, सारीका गौरकार यांनी केली. व सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. संजय धोटे हे करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




