महत्वाच्या बातम्या

 ३ लाखांची लाच मागून ५० हजार घेताना अडकलेल्या आरएफओसह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / मुलचेरा : सागवान तस्करीच्या वनगुन्ह्यात फर्निचर विक्रीचे लायसन्स रद्द न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागून, त्यापैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी (RFO) श्रीनिवास कटकू, वनरक्षक नीतेश मडावी आणि दलाल प्रदीप मंडल या तिघांनाही अहेरी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पेड्डीगुडम येथे सापळा रचून ही धडक कारवाई केली होती.

त्यानंतर २० जून रोजी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तक्रारदारावर ११ जून रोजी अवैध सागवान तस्करीप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यामुळे तक्रारदाराच्या फर्निचर विक्रीचे लायसन्स रद्द होऊ नये, यासाठी आरएफओ कटकू आणि वनरक्षक मडावी यांनी दलाल प्रदीप मंडल याच्यामार्फत ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले.

त्यानुसार १९ जून रोजी गणेशपूर ते मुलचेरा रोडवर ही लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहाथ दबोचले. या कारवाईमुळे वनविभागातील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून एसीबी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos