महत्वाच्या बातम्या

 इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न


- शाळेच्या विकासात्मक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : इंदिरा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा, इंदिरानगर गडचिरोली येथे शाळेच्या विकासात्मक विषयांच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीची महत्वपूर्ण बैठक  भाजपा महिला आघाडी जिलाध्यक्ष तथा नगरसेविका(माजी नगराध्यक्ष) योगिता पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

बैठकीमध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळेच्या समोरील बाजूस संरक्षणात्मक गट्टू लावणे, जीर्ण अवस्थेत असलेली जुनी शाळा इमारत पाडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करणे, इंदिरानगर परिसर मोठी वस्ती असल्यामुळे येथे इयत्ता सहावीच्या वर्गास मंजुरी  देणे, शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी शिक्षक भरती करणे तसेच शाळेला डिजिटल शाळा म्हणून विकसित करणे आदी विषय बैठकीत प्रामुख्याने मांडण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी येलपुलवार, सचिव तथा मुख्याध्यापक रविंद्रजी ऊईके, सदस्या मीनाक्षी दुधे, सरितामडके, पौर्णिमा कोडाप, कुंदा विरवार यांच्यासह समितीचे सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेचा भौतिक व तांत्रिक विकास करण्यासाठी सर्वांनी एकमताने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos