महत्वाच्या बातम्या

 अल्पवयीन मुलीशी छेडछाड : ४७ वर्षीय आरोपीस विविध कलमांखाली सक्त कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल अल्पवयीन मुलीशी छेडछाड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय-३, चंद्रपूर यांनी आरोपीस दोषी ठरवत विविध कलमांखाली सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीविरुद्ध POCSO व भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे सिद्ध झाल्याचे नमूद केले.

राजुरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ३२७/२०२५ अंतर्गत दाखल प्रकरणात १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणाची सुनावणी पी. एस. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायाधीश-३, चंद्रपूर यांच्या न्यायालयात झाली.

न्यायालयाने आरोपीस POCSO कायद्याच्या कलम १० अंतर्गत पाच वर्षे सक्त कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच BNS कलम ७६ अंतर्गत तीन वर्षे सक्त कारावास, कलम ३५२ अंतर्गत एक वर्ष सक्त कारावास आणि कलम ३५१(२) अंतर्गत एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. प्रत्येक कलमानुसार एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील आसीफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काळे यांनी केला असून, न्यायालयीन पैरवी म्हणून मपोअं ललिता शेंडे यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos