महत्वाच्या बातम्या

 वर्धा शहरात पथनाट्‌याद्वारे किटकजन्य आजाराची जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा हिवताप कार्यालय व परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा शहरातील विविध ठिकाणी पथनाट्याद्वारे किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.

शहरात इतवारा बाजार, बजाज चौक, आर्वी नाका व प्रशासकीय भवन परीसरात पथनाट्य करण्यात आले. पथनाट्यामध्ये डेंग्यू व हिवताप आजार कसा टाळता येईल, याबाबत जनजागृती करण्यात आली. यामध्ये डेंग्यू आजार व हिवताप आजार कसा टाळता येईल, याचे प्रात्यक्षिक जनतेसमोर दाखविण्यात आले. पथनाटयातून मुले खेळत असतांना डासापासून कसा बचाव करता येईल, तसेच डासापासून कसे संरक्षण करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

किटकजन्य आजार टाळण्यासाठी परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे, घराजवळील नाल्या वाहत्या करणे तसेच केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास किटकजन्य आजार टाळता येते, असे प्रात्याक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. यामध्ये परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाच्या विद्यार्थीनींद्वारे योग्य प्रकारे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पथनाट्याला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलीनी विखे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पर्यवेक्षक आशिष देशमुख, आरोग्य निरीक्षक कुसुमाकर राऊत, गणेश निमजे, आरोग्य सेवक एकनाथ देवडे, निलेश गायकवाड, प्रविण मानमोडे, नितीन झाडे, रुपेश राहाणे, सचिन दिवेकर, गणेश निमजे, एकनाथ देवडे, निलेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले, असे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos