महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ मे महत्वाच्या घटना

१८४९ : जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.

१९०७ : मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

१९४६ : सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.

१९५५ : एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली.

१९७६ : होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.

१९९० : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

१९९२ : एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

१९९८ : मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

२००० : व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००० : कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

७ मे जन्म

१८६१ : पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)

१८८० : भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९७२)

१८९२ : क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १९८०)

१९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच. भूमी यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९१)

१९१२ : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८९ – अहमदाबाद, गुजरात)

१९२३ : मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म.

१९४८ : मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म.

१९६७ : भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत यांचा जन्म (मृत्यू : ४ सप्टेंबर २०२२)

१९४९ : भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यंचा जन्म (मृत्यू : २ सप्टेंबर २०१४)

१९३२ : लेफ्टनंट जनरल - महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक राज मोहन वोहरा याचा जन्म (मृत्यू : १४ जून २०२०)

७ मे मृत्यू

१९२४ : भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन.

१९९१ : लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९९४ : ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.

२००१ : लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९०५)

२००१ : गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन. (जन्म: १३ जून १९२३ – अंबाला, पंजाब)

२००२ : मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

२०२२ : पश्चिम बंगालचे वक्तृत्वकार पार्थ घोष यांचे निधन

२०११ : कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विलार्ड बॉयल यांचे निधन (जन्म: १९ ऑगस्ट १९२४)

१९९८ : दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचे निधन (जन्म: २३ फेब्रुवारी १९२४)

१९९१ : लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचे निधन (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९८७ : अमेरिकन सैनिक आणि कार्यकर्ता, गे मेन्स हेल्थ क्रायसिसचे सहसंस्थापक पॉल पोफम यांचे निधन (जन्म: ६ ऑक्टोबर १९४१)





  Print






News - todayspecialdays




Related Photos