महत्वाच्या बातम्या

 गोंडपिपरीत अवैध देशी दारू विक्रीवर एलसीबीचा छापा : आरोपी अटकेत, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ मे २०२६ रोजी गोंडपिपरी तालुक्यात छापा टाकून अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाईत सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुकाराम वसंत ढुमणे (वय ३५), रा. वॉर्ड क्र. ०१, पनोरा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर हा आपल्या साई ऑटोमोबाईल दुकानाच्या मागील बाजूस अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता आरोपीकडून ९० मिली क्षमतेच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या तब्बल १,७५० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे अपराध क्रमांक २०९/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, मिलिंद टेकाम, सुरेंद्र महंतो तसेच पोअं सुमित बरडे यांचा समावेश होता.





  Print






News - Chandrapur




Related Photos