अठरावर्षीय पिडीतेचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी जिटिव्हीचे वार्ताहर संजय ढवळे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- संशयित आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी फेटाळला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील एका औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली एका १८ वर्षीय पिडीतेचा विनयभंग केल्या प्रकरणी संशयित आरोपी घाटंजी येथील जिटिव्हीचे वार्ताहर संजय ढवळे विरुद्ध अपराध क्रंमाक ०३४२/२०२६ १३ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ३ (|) (w) (|) (||) अंतर्गत घाटंजी पोलीस ठाण्यात विनयभंग व ॲट्रोसीटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी संजय ढवळे हा सद्यातरी फरार असून घाटंजी पोलीस त्याचा शोध घेत आहे.
दरम्यान, संशयित आरोपी संजय ढवळे यांनी ॲड. जयंत ठाकरे यांच्या मार्फत यवतमाळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सदर प्रकरणाची सुनावणी, २७ एप्रिल २०२६ रोजी झाली. सदर प्रकरणात आरोपीचे वकील ऍड. शाम कापरेकर यांनी युक्तिवाद केला. मात्र, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु. बघेले यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल करित आहे. घाटंजी तालुक्यातील एक १८ वर्षीय पिडीता ही घाटंजी येथे ५/६ महिण्यापासून भाडयाने राहत होती. तिच्या सोबत आणखी तिचे तीन मैत्रीणी सुद्धा तेथे भाडयाने राहत होते.
संशयित आरोपी जिटीव्हीचे वार्ताहर संजय ढवळे हा एक दिवसाआड त्या १८ वर्षीय पिडीतेला भ्रमणध्वनी करुन जेवन झाले कां? अभ्यास झाला कां? मोटार सुरू केली आहे, असे म्हणत होता. पिडीता ही काका या नात्याने घर मालकाशी बोलत होती.
अठरावर्षीय पिडीता ही ११ एप्रिल २०२६ रोजी आपल्या गावी असतांना तिला घर मालकाचा मेसेज आला की, माझ्या घराच्या रुमला कलरींग करायचे आहे. त्यामुळे १८ वर्षीय पिडीता ही गांवावरून रुमवर आली. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान संशयित आरोपी संजय ढवळे हा कलर घेऊन रुम मध्ये गेला. त्यांनी रुम मधील एका भिंतीला कलर मारला. त्याच वेळी संशयित आरोपी संजय ढवळे हा त्या १८ वर्षीय पिडीतेच्या बेडवर बसुन माझा पाय दुखत आहे, थोडासा पाय दाबुन दे, असे पिडीतेला म्हटले. विशेष म्हणजे वार्ताहर संजय ढवळे याला पिडीता ही काका सारखे समजत असल्याने त्याचे पाय दाबुन दिले. त्या नंतर तिच्या खांद्यावर हात टाकून छेडछाड करुन तिचा विनयभंग केला. घाटंजी येथील जिटीव्ही वार्ताहर संजय ढवळे हा सद्यातरी फरार असून घाटंजी पोलीस त्याचा शोध घेत आहे.
सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल हे करित आहे.
News - Rajy




Petrol Price




