महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली येथे चंद्रकांत दादासाहेब यांचा भव्य हितगुज व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेञ त्र्यंबकेश्वर, जिल्हा-नाशिक च्या वतीने परमपूज्य गुरुमाऊली यांच्या सानिध्यात कारंजा (लाड) येथे २१ फेब्रुवारीला होणाऱ्या एक दिवशीय श्रीगुरुचरित्र पारायण आणि सत्संग सोहळ्याच्या नियोजनार्थ प. पू. गुरुमाऊली यांचे सगुण स्वरुप गुरुपुञ आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या अमृततुल्य हितगुज तसेच विविध समस्यांवर योग्य उपाय याकरिता अमृतमय सत्संग व मार्गदर्शन सोहळा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ओमनगर चामोर्शी रोड, गडचिरोली येथे १२ जानेवारी गुरुवारला सायंकाळी ५ वा. आयोजित केलेला आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व सेवेकरी तथा संपूर्ण भाविक जनतेला विनंती करण्यात येते की, या अमृतमय सोहळ्यास उपस्थित राहून आदरणीय दादा साहेबांचे अमृतवाणीतून होणाऱ्या अमृत विचारांचा अवश्य लाभ घेवून आपले जीवन आनंदमय सुखमय करावे हे कळकळीचे व आग्रहाचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos