महत्वाच्या बातम्या

 घराच्या जागेच्या वादातून थोरला भाऊ व पुतण्याने धाकट्या भावाला मारहाण केले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : वडिलोपार्जित घराच्या जागेच्या वादातून देवरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम धोबीसराड येथे बुधवारी २५ दुपारी एका गंभीर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात थोरला भाऊ व त्याचा पुतणा यांनी धाकट्या भावाला मारहाण केली.

प्राप्त माहितीनुसार, उमेश बाबूराव उके (वय ३०, रा. धोबीसराड) याला घरकूल मंजूर झाल्यानंतर जेसीबीद्वारे जुने घर पाहून जागेचे सपाटीकरण सुरु केले होते. यावेळी, राजेंद्र बाबूराव उके (वय ४९) आणि स्वप्निल राजेंद्र उके (वय २३) हे आरोपी घटनास्थळी आले.

वाद सुरू होताच आरोपींनी उमेशला शिवीगाळ करत धमकी दिली की, येथे घर बांधू नकोस. त्यानंतर राजेंद्रने लाकडी दांड्याने उमेशच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर आणि खांद्यावर वार केले. त्याचबरोबर, स्वप्निलने उमेशला खाली पाडून छातीवर बसून हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या उमेशच्या आईलाही आरोपींनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाला असून, त्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर देवरी पोलिस ठाण्यात आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ३५१ (३), ३५२, ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.





  Print






News - Gondia




Related Photos