महत्वाच्या बातम्या

 नागपूर-गोवा इंडिगो उड्डाण सेवा पुन्हा सुरू : नवीन मार्गांसाठी थोडा थांबावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर-गोवा इंडिगो उड्डाण सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणापूर्वी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते. या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण तात्काळ थांबवण्यात आले आणि गोवा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

त्यानंतर मुंबईहून आलेल्या तज्ज्ञांच्या टीमने विमानाच्या नोज व्हील जवळील फ्यूल लीकचा अचूक शोध घेऊन ते दुरुस्त केले. सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्यानंतर आणि पूर्ण समाधान झाल्यानंतर हे विमान फेरी फ्लाइट म्हणून नागपूरहून दिल्लीला पाठवण्यात आले. नंतर ते हैदराबादमार्गे पुन्हा सेवेत दाखल झाले असून, आता हे विमान प्रवासी सेवेसाठी सज्ज आहे.

दरम्यान, नागपूरहून नवीन उड्डाणांची अपेक्षा असलेल्या प्रवाशांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. इंडिगोने स्पष्ट केले आहे की सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही नवीन मार्गावर उड्डाण सेवा सुरू करणे शक्य नाही.

सध्या नागपूरहून दररोज सुमारे २५ उड्डाणे देशातील १० शहरांकडे जातात आणि त्याच संख्येने परतीच्या उड्डाणांची सेवा सुरू आहे. समर शेड्यूलनुसार २९ मार्चपासून काही उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

प्रवाशांवर भाडेवाढीचा ताण -

मध्यपूर्वेतील युद्ध आणि वाढत्या तणावामुळे विमान वाहतूक क्षेत्रावर दबाव आला आहे. जेट फ्यूलच्या वाढत्या दरांमुळे एअरलाईन्स कंपन्यांवर आर्थिक ताण पडला असून, परिणामी भाडेवाढ ठरली आहे आणि त्याचा थेट भार प्रवाशांवर पडत आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास भविष्यात तिकिटांच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos