महत्वाच्या बातम्या

 नवेगाव येथील राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाला अखेर सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर नवेगाव (वाघाडे) गाव आहे. कोरंबी ग्रामपंचायत अंतर्गत हा गाव समाविष्ट असून राष्ट्रीय महामार्गावर नवेगाव मध्यवर्ती ठिकाण असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस बांधकाम कंपनीच्या कामाची सुरुवात आणि शेवट देखील याच गावातून झाला आहे.

गावाच्या हिताच्या दृष्टीने गावाकडे जाणार रस्ता पूर्ण न करता तो अर्धवटच ठेवण्यात आला. साधारणत: ५०० ते ८०० मीटर अंतरावरील रस्त्याचे काँक्रेटिकरन होणे बाकी आहे. मागील दोन वर्षापासून हे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील दिवसरात्र वाहतूक सुरू असल्याने व त्यातच सुरजागड येथून कच्चा लोहखनिज मालाचे याच मार्गाने वाहतुक सुरू असल्यामुळे या मार्गावरील शेतीत आणि मानवी वस्तीत सुध्दा धूळ साचत असून धुळीने प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषनाचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे.

धुळीमुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. सर्दी, खोकला, दमा यासारख्या आजाराचा त्रास नागरीकांना होत आहेत. रस्त्याचे काम अर्धवट झाले असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. नवेगाव (वाघाडे) गावातील समस्या गंभीर असून याचा त्रास गावकऱ्यांना आणि रस्त्यावरील प्रवाशांना देखील होत आहे. त्यामुळे नवेगाव (वाघाडे) ते विठ्ठलवाडा या मार्गावर शिल्लक राहिलेल्या मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. याकरीता ग्रा.पं. सदस्य नितेश मेश्राम यांनी संबंधित बांधकाम कंपनीच्या भेटी घेतले. सातत्यपूर्ण पाठपुरावा त्यांच्याकडे केले. अंतिम क्षणी त्यांनी सहकार्य केले, व  याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाणे घेतले. अखेर नितेश मेश्राम यांच्या प्रयत्नाला यश आले आणि मेश्राम यांनीच स्वतः कुदळ मारून बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी (एजी कांट्रक्शन औरंगाबाद येथील प्रोजेक्ट मॅनेजर मोहितकुमार, एजी कांट्रक्शन इंचार्ज मोहिसिंग पटेल, सामाजिक कार्यकर्ता कुणाल गायकवाड व गावकऱ्यांच्या समक्ष कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला या मार्गाच्या कामाचा शुभारंभ केले.

त्यामुळे मार्गावरील अनेक गावचे प्रवाशी, स्थानिक जनतेकडून त्यांचे आभार मानले जात असून आता नागरिकांचा पुढील प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos